विद्यापीठ संघात सानिका पाटील,उर्जित पवार,अथर्व वांद्रे यांची निवड

Wed 21st Feb 2024 11:08 am
सातारा येथील प्रोफेशनल क्रिकेट अकादमीच्या तीन खेळाडूंची विद्यापीठ क्रिकेट संघात निवड झाली आहे

उंब्रज/प्रतिनिधी


कर्नाटक,उडपी येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ क्रिकेट संघात सानिका प्रवीण पाटील हिची निवड झाली आहे.मध्यप्रदेश येथे झालेल्या पश्चिम विभाग अंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत सानिकाने अष्टपैलू कामगिरी केली.त्या आधारे तिची अखिल भारतीय अंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली.

दरम्यान,याच अकादमीचे उर्जित अजितसिंह पवार आणि अथर्व वांद्रे यांची जळगाव येथे होणाऱ्या पश्चिम विभाग अंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी सातारा रयत विद्यापीठ क्रिकेट संघात निवड झाली.ज्येष्ठ खेळाडू राजू जाधव, प्रशांत साळुंखे यांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले.जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुरेश जाधव,सचिव नरेश देसाई,नगरसेवक भालचंद्र निकम,प्रशांत शहा,प्रमोद जाधव,केतन दोशी,तुषार कुंभार,जिल्हा क्रिकेट असो.चे अध्यक्ष निशांत गवळी,सचिव इर्शाद बागवान,उपाध्यक्ष ऍड.कमलेश पिसाळ व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.