कराड उत्तर भाजपच्या बॅनरवर काकांचा फोटो

Tue 5th Nov 2024 05:26 pm
काँग्रेसनिष्ठवंतासह विविध पक्ष संघटनां मधून आश्चर्य व्यक्त होत आहे

उंडाळे / प्रतिनीधी

 आयुष्यभर राज्यातील राष्ट्रीय काँग्रेसशी निष्ठावत असलेले माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचा फोटो कराड उत्तर भाजपच्या गाव भेट संपर्क बॅनरवर झळकत असल्याने काँग्रेसनिष्ठवंतासह विविध पक्ष संघटनां मधून आश्चर्य व्यक्त होत आहे. माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील यांनी 1985 पासून सलग सात वेळा कराड दक्षिण मधून विधानसभा मतदारसंघाचे काॅग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले काँग्रेस पक्षाचे माध्यमातून त्यांनी सातारा जिल्ह्यावर व जिल्हा परिषद जिल्हा बँक यासह. 


जिल्ह्यातील संस्था वर पकड ठेवली जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व राखले होते जिल्हा व तालुका.पातळीवरील विविध संस्था उंडाळकर यांचे नेतृत्व मनात होत्या. त्यांनी काँग्रेसमध्ये आपली उभी हयात घालवली शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही . गत दहा बारा वर्षांपूर्वी काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर राज्यात भाजप सरकार सत्तेत आले. त्यावेळी विलासराव पाटील उंडाळकर व त्यांचे पुत्र. उदयसिंह पाटील उंडाळकर यांना भाजप व मित्र पक्षाकडून सत्तेची अनेक अमिषे आली. परंतु उंडाळकर यांनी काँग्रेसनिष्ठा ढळू दिली नाही. 

आपला मुलगा उदयसिंह पाटील यांनाही काँग्रेस सोडू नकोस यासाठी अनेकदा दबाव ठेवला. याशिवाय त्यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर यांनाही विलास काकांच्या हयातीत अनेकदा भाजप कडून पदाची. अमिषे दाखवली परंतु उंडाळकर यांच्या हयातीत भाजपची साथ कधीही केली नाही व उतार वयातही विलासराव पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसचे दुरावलेले नाते शेवटच्या क्षणी जुळवत उदयसिंह पाटील उंडाळकर यांना काँग्रेसच्या प्रवाहात आणले परंतु काँग्रेस विचार सोडला नाही त्यामुळे काँग्रेसचे एकनिष्ठ राहिलेल्या विलासराव पाटील उंडाळकर यांचा फोटो भाजप कराड उत्तर मतदार संघाचे. बॅनरवर झळकल्याने काँग्रेस निष्ठावंतांमधून व मित्रपक्ष मधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



माजी मंत्री स्व विलासराव पाटील उंडाळकर व पी.डी.पाटील यांचे राजकीय सख्य होते त्यांची राजकीय अंतर्गत युती कधीही तुटली नाही परंतु त्यांच्या पाश्चात पी डी पाटील यांचे चिरंजीव माजी मंत्री बाळासाहेब पाटील व विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र ऍड उदयसिंह पाटील यांच्यात सातत्याने राजकीय रस्सिखेच राहिली. याच माध्यमातून सातारा जिल्हा बँकेत आ. बाळासाहेब पाटील विरुद्ध उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा सामना झाला यात आ. बाळासाहेब पाटील यांनी उदयसिंह पाटील यांचा निसटता पराभव केला काही दिवसांनंतर आ. पाटील यांनी उदयसिंह उंडाळकर यांचे विरोधक कराड दक्षिणेतील भाजपचे अतुल भोसले यांना बरोबर घेत युती केली. आणि कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या विरोधात पॅनल उभे केले .येथेही उंडाळकर विरोधात बाळासाहेब पाटील असा सामना झाला यावेळी आ. पाटील विरोधक भाजपचे मनोज घोरपडे व भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम , रामकृष्ण वेताळ यांनी उदयसिंह पाटील यांना साथ केली. त्यामुळे सलग दोन वेळा बाळासाहेब पाटील व उदयसिह पाटील यांच्यात उघड व थेट राजकीय संघर्ष झाल्याने उंडाळकर गट बाळासाहेब यांच्या विरोधात काम करत राहिला त्यातूनच उंडाळकर गट.आ बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात असणाऱ्या मनोज घोरपडे यांच्या पाठीशी विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याचे दिसते जिल्हा बँकेच्या पराभव व बाजार समितीसाठी केलेला थेट विरोध. याचा वचपा काढण्यासाठी हा प्रपंच असल्याची ही चर्चा दक्षिण व उत्तर मतदार संघात सुरु आहे.