उंब्रज येथे किड्स वेअरला आग; लहान मुलांचे कपडे जळाले

Sun 9th Nov 2025 06:06 pm

उंब्रज/ प्रतिनिधी 

उंब्रज ता. कराड येथे किड्स वेअरला अचानक आग लागल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  दुकानातून धूर येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुकान मालकांना यांची माहिती  कळविली. त्यानंतर  सदरचे दुकान उघडून आग विझवण्यात आली आहे. दुकानातील लहान मुलांचे कपडे, गिफ्ट जळून हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.  याप्रकरणी दुकान मालक दिपाली पाटील यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आग लागण्यामागचे कारण समजू शकले नाही.


     याबाबत अधिक माहिती अशी की,  रविवार दि. 9 रोजी उंब्रज ता.  कराड गावचे हद्दीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेपासुन जवळ एबीपी प्लाझा बिल्डिंग आहे.  या बिल्डिंगमध्ये सौ.दिपाली तानाजी पाटील राहणार नानेगाव यांनी दुकान गाळा भाड्याने घेऊन तेथे विघ्नहर्ता गिफ्ट अँड किड्स वेअर या नावाने दुकान सुरू केले आहे. रविवारी सकाळी दुकान बंद असताना अतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे येथील शेजारील दुकान गाळेधारकांच्या लक्षात आले त्यांनी सदरची माहीती पाटील यांना दिली. त्यानंतर काही वेळानंतर दुकान मालकांनी दुकान उघडून आग विझवली. तोपर्यंत लहान मुलांचे कपडे, गिफ्ट वस्तू, टेलरिंग मटेरियल तसेच लाकडी कपाट, लेडीज अंडरगारमेंट साहित्य आगीत जळून  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान याबाबत  दिपाली पाटील वय ४० रा. नानेगाव ता. कराड यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली असून आगीत किती नुकसान झाले व आग कशी लागली यांची माहिती मिळू शकलेली नाही.